जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा

0
नंदुरबार I नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास न्यायालयाने दंडाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती,अशी की,सुरुंग, ता.धडगाव येथील भीमसिंग पाडवी पावरा याने गार्‍हाणे निराकरण प्राधिकरणकडे सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त घोषित करण्यात यावे म्हणून 2006 पासून अर्ज केले होते, परंतु 2012 मध्ये त्याचा अर्ज निकाली काढून नामंजूर झाला होता.याचे वाईट वाटून त्याने 27 सप्टेंबर 2013 रोजी प्रकल्पग्रस्त घोषित करावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेस जाऊन राष्ट्रीय ध्वजाला दोर बांधून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याला अधिकारी व कर्मचारीयांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता.

याबाबत नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे.सी.गुप्ता यांच्या न्यायालयात खटला सुरु होता. दरम्यान साक्षी पुरावे तपासल्यानंतर भिमसिंग पावरा हा दोषी आढळल्याने त्याला 3 हजार रुपयांचा दंड आणि 8 दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.सहायक पोलीस उपनिरीक्षक सी.ए.पाटील यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. सी.ए.पाटील यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश धनगर यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

*