Type to search

नंदुरबार

अर्धवट बांधलेल्या पुलावरून मालवाहू ट्रक कोसळून अपघात

Share

नंदुरबार । पानबारा ता. नवापुर येथील सराई नदीच्या अर्धवट बांधलेल्या पुलावरून मालवाहू ट्रक खाली कोसळून झालेल्या गंभीर अपघातात चालक गंभीर जखमी झाला.

नवापुर तालुक्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. यातून पुलाचे काम अर्धवट आहे. ट्रक ( टी.एन.52,एफ.1465) हा तामिळनाडू राज्यातून सुरतकडे केबल वायर वाहून नेणारा ट्रक कोंडाईबारी घाटात आला. पोलीस मदत केंद्रावर या ट्रकला थांबवण्यास सांगण्यात आले. परंतू चालकाने वाहन न थांबता भरधाव वेगाने दामटला, ट्रक जुन्या पलावरून न चालवता अर्धवट बांधकाम असलेल्या पुलावरून चालवला. यात पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्याचे दिसून न आल्याने ट्रक थेट 25 फूट खोलीवर असलेल्या सराई नदीत कोसळला. यामुळे ट्रकचा चक्काचूर झाला असून बाळकृष्ण सुब्रमण्यम हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला पोलिसांनी पानबारा येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पुढील तपास पीएसआय चंद्रकांत शिंदे, अतुल पाटील, प्रदीप वाघ करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!