Type to search

नंदुरबार

चटोपाध्याय वेतनश्रेणीसह विविध मागण्यांचे निवेदन

Share

कळंबू ता. शहादा । वार्ताहर – वरिष्ठ वेतनश्रेणी चटोपाध्याय, प्रलंबित प्रश्न तात्काळ निकाली करण्यात येऊन 2017 नंतरचे बारा वर्ष, चोवीस वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांचेही प्रस्ताव तालुकास्तरावरून तात्काळ मागून संबंधित शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा, अश मागणीचे निवेदन नुकतेच नंदुरबार जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना पुरोगामी शिक्षक संघटनेमार्फत देण्यात आले.

यामध्ये नंदुरबार जिल्हा आदिवासी क्षेत्रबहुल जिल्हा असल्याने या आदिवासी क्षेत्रात काम करणार्‍या शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून एक स्तर वेतन श्रेणी शासनाने लागू केलेली आहे. शासनाने सातव्या वेतन आयोगातही एक स्तर वेतन श्रेणी लागू करण्याचे आदेश दिले असतानादेखील नंदुरबार जिल्ह्यात अजूनही एक स्तर वेतन श्रेणीनुसार वेतन निश्चितीची कार्यवाही प्रलंबित आहे. या कठीण क्षेत्रात काम करत असलेल्या शिक्षकांना तात्काळ एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ मिळवून द्यावा, प्राथमिक शिक्षकांचे जीवन वेतन दरमहा एक तारखेला होण्यासाठी शासनाने वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. असे असूनही जिल्ह्यात 1 तारखेला जीवन वेतन होत नाही, वेतन दरमहा 1ते 5 तारखेच्या आत होईल,

यासाठी संबंधित कर्मचार्‍यांना आदेश द्यावेत, जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये अन्याय झालेल्या शिक्षकांचे अर्ज स्वीकारून अशा अन्यायग्रस्त शिक्षकांना उचित न्याय मिळवून द्यावा, 2005 नंतर सेवेत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना, सर्वच जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना सेवानिवृत्तीनंतर खूप मोठा आधार असतो. परंतु शासनाने डीसीपीएस योजना लागू केली असून ती 2005 नंतर लागलेल्या कर्मचार्‍यांना लागलेली आहे. जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचार्‍यांना लागू करण्यात यावी, तसेच अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांची वादळ, वारा, पाऊस यामुळे मोठी हानी झालेली आहे. अशा सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून अशा शाळांच्या दुरुस्तीसाठी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, शालेय गणवेश निधीची रक्कम तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खात्यांवर जमा करण्यात यावी,

शिक्षकांवरील अतिरिक्त कामांचा बोजा कमी करावा, शिक्षकांकडून ऑनलाइनची माहिती व पुन्हा हार्ड कॉपी प्रशासनाकडून मागणी केली जाते. ऑनलाइन कामाचा अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही. परिणामी त्यांच्या गुणवत्तेवर होत असतो याकरिता अतिरिक्त कामातून शिक्षकांची सुटका करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष पंकज भदाणे, सरचिटणीस रविंद्र अडगळे, कोषाध्यक्ष विजय सोनार, उपाध्यक्ष रविंद्र पवार उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!