Type to search

नंदुरबार

सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचा पैसा समाजातील विद्यार्थ्यांसाठी खर्च

Share

नंदुरबार । शहादा येथील कलाल समाजाचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र डोंगरसा कलाल यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमावर खर्च होणारी रक्कम समाजातील मुलामुलींना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच विद्यार्थ्यांसाठी इतर सोयीसुविधा पुरविण्यावर खर्च करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी त्यांनी नंदुरबार येथील कलाल समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना वहया वाटप करुन केली आहे.

नंदुरबार कलाल समाजातर्फे समाजातील सर्व गुणवंत विद्यार्थी, विशेष यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच समाजातील पदोन्नती प्राप्त कर्मचारी, सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त संबंधीतांचा सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार कलाल समाज अध्यक्ष निश्चल गिरनार होते. प्रमुख अतिथी म्हणून शहादा येथील कलाल समाजाचे अध्यक्ष राजेंद्रसा कलाल, सौ.नयना कलाल, कैलाससा कलाल, किशोरसा कलाल, सौ.सुचित्रा बावीस्कर उपस्थित होते.

शहादा येथील राजेंद्रसा कलाल हे काही महिन्यांपुर्वी शिक्षकाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्तीबद्दल कार्यक्रम घ्यावा, अशी आप्तेष्ठांची इच्छा होती. परंतू त्यांनी हा कार्यक्रम न घेता, त्या कार्यक्रमावर होणारा खर्च समाजासाठी वापरावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यानुसार त्यांनी समाजातील सर्व पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वहया वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यापुढे समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन तसेच इतर नवनवीन उपक्रम ते राबविणार आहेत. या उपक्रमाची सुरुवात नंदुरबार येथील कलाल समाजातर्फे आयोजित गुणवंतांच्या गौरव कार्यक्रमपासून त्यांनी केली आहे. नंदुरबार शहरातील समाजातील सर्व इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी प्रत्येकी अर्धा डझन वहया वाटप केल्या आहेत. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

दरम्यान, नंदुरबार कलाल समाजातर्फे आयोजित या गुणवंत गौरव कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मोमेंटो देण्यात आला. त्यानंतर समाजातील सेवानिवृत्त कैलाससा गोवर्धनसा कलाल, किशोरसा यशवंतसा कलाल यांचा गौरव करण्यात आला. शहादा न्यायालयाचे कर्मचारी रुपेश गिरनार हे जेएमएफसीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर न्यायालयीन कर्मचारी अमोल संके, आरोग्य विभागाचे पंकज बागुल, स्टेट बँकेचे प्रशांत जावरे यांना पदोन्नती मिळाल्याने त्यांचाही गौरव करण्यात आला. प्रास्ताविक महाराष्ट्र बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक गजाननसा जावरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कलाल समाज महिला अध्यक्षा सौ. रत्ना गिरनार यांनी केले. राजेंद्र कलाल, सौ.नयना कलाल, निश्चल गिरनार, प्रशांत जावरे, सोनुराज गिरनार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. आभार हरिष कलाल यांनी मानले. यावेळी बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!