Type to search

नंदुरबार

होमगार्ड दलातील 253 जवान प्रशिक्षणासह सज्ज, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थींचा गौरव

Share

नंदुरबार । नंदुरबार जिल्हा होमगार्ड दलातर्फे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात 253 जवान परिपुर्ण प्रशिक्षणासह सेवेसाठी सज्ज झाल आहेत. समारोप प्रसंगी शिबीरात सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थीचा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
नंदुरबार जिल्हा होमगार्डमध्ये मध्ये 253 होमगार्ड जवान परिपुर्ण प्रशिक्षणासह सेवेसाठी सज्ज झाले आहेत.जिल्हा पोलीस दलात पोलीसांचे सहयोगी म्हणून होमगार्ड दलातील जवान जिल्हावासीयांचे सेवेसाठी नेहमी तत्पर असतात.

आतापर्यंत जिल्ह्यात 600 जवान हजर होते. नुकतेच नव्याने भरती करण्यात आलेले 253 पुरुष होमगार्डस जवानांना पोलीस मुख्यालयाचे कवायत मैदानावर प्रशिक्षण शिबीरातुन परिपुर्ण शारीरीक प्रशिक्षण देऊन सज्ज करण्यात आले आहे. शिबीरात मानसेवि होमगार्डसना शस्त्र प्रशिक्षण, लाठी, कवायत,अग्निशमन विमोचन इत्यादी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण शिबीराचा समारोप जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे हस्ते संपन्न झाला.समारंभाचे वेळी प्रशिक्षणार्थी 253 पुरुष होमगार्डसनी उकृष्ट मानवंदना देऊन संचलन केले. संचलन परेडचे परेड कमांडर म्हणुन प्रदिप शामराव अहिरे, नंदुरबार पथक या होमगार्डनी केले व दुय्यम परेड कमांडर म्हणुन अशोक जोहया पावरा ,तळोदा पथक यांनी काम केले. त्यानंतर पोलीस अधिक्षक यांचे हस्ते प्रशिक्षण शिबीरात सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणुन तळोदा पथकाचे अशोक जोहर्‍या पावरा यांचा व 5 होमगार्ड पथकातुन नंदुरबार पथक प्रदिप अहिरे व रविंद्र चौरे,राहुल मवाळ. शहादा पथक मंगेश मराठे व निखील डोडवे.नवापूर शैलेश मराठे.अक्कलकुवा रविंद्र वसावे यांचा उत्कृष्ट होमगार्ड म्हणुन गौरव करण्यात आला.त्यानंतर अपर पोलीस अधिक्षक तथा जिल्हा समादेशक चंद्रकांत गवळी,यांनी सर्व उपस्थित होमगार्डसना प्रतिज्ञा दिली.

तसेच सर्व होमगार्डसना मार्गदर्शन केले, बंदोबस्तावर कर्तव्यावर असतांना घ्यावयाची काळजी , शिस्तीचे पालन करणे इत्यादी बाबींवर मार्गदर्शन केले.पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी अध्यक्षीय भाषणात होमगार्डस कायदा व सुव्यवस्था राखण्यांस महत्वपुर्ण मदत करतात त्यांचे कार्य उल्लेखनिय असुन आगामी विधानसभा निवडणूकीत सर्व होमगार्डसची आवश्यकता लागणार असुन सर्वानी उत्तम व चोख बंदोबस्त करावा असे आवाहन केले.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले उपस्थित होते. सर्व प्रशिक्षण शिबीरात प्रशासकीय व इतर नियंत्रण ठेवणारे,देखरेख ठेवणारे राखीव पोलीस निरीक्षक श्री. राजपुत सर्व होमगार्डसना उत्कृष्ठ प्रशिक्षण देणारे राजेंद्र साळुखे,जया वसावे,रणसींग सनेर,रविंद्र पवार,भगतसींग चव्हाण, उत्त्तम वसावे यांचाही यांचाही गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्र श्री. राजपुत यांनी तर आभार प्रदर्शन डी.आर.चौधरी यांनी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!