Type to search

नंदुरबार

भटके-विमुक्त हक्क परिषदेची जिल्हा बैठक उत्साहात

Share

नंदुरबार । शहरातील साक्रीनाका परीसरांतील जोशी-गोंधळी सामाजिक भवनात भटके-विमुक्त हक्क परीषदेची स्थानिक जिल्हा बैठक जिल्हाध्यक्ष रामकृष्ण मोरे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. विभागीय अध्यक्ष पुरुषोत्तम काळे, प्रदेश संघटक सुपडू खेडकर यांची प्रमुख उपस्थीती होती. भटके-विमुक्त हक्क परिषदेच्या नंदुरबार जिल्हा युवा अध्यक्षपदी रवि गोसावी यांची निवड करण्यात आली.कार्यकारीणी विस्तारासह विवीध विषयांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीत आजपर्यंतचा कामाचा आढावा घेण्यात येऊन आर्थिक, वंचीत-उपेक्षीत या घटकांतील द्रारिद्रय निर्मूलनासाठी शासनाच्या विविध योजना, त्यांच्या तळागाळातील लाभार्थीना येणार्‍या अडचणी, योजना अंमलबजावणीतील त्रुटी यांवर प्रकाशज्योत टाकण्यात आला.शासनाचे या क्षेत्रातील अधिकारी, संबंधित प्रतिनिधी यांना याबाबी निदर्शनास आणून देण्याचे ठरले. तसेच लवकरच या कामी शासनाचे लक्ष वेधणेसाठी जनजागृती मेळावा घेण्याचा निर्धार करण्यात आला.

कार्यकारीणी विस्तार करतांना महेंद्र बोरदे, राजेंद्र गुंजाळ, दिनकर बेंद्रे, मधुकर चव्हाण यांना जिल्हा संघटक, जिल्हाउपाध्यक्ष सुरेश जोशी तर जिल्हा सहसचिव तुकाराम लंबोळे, महादु हिरवाळे यांना संधी देण्यात आली.

नंदुरबार तालुकाध्यक्षपदी देवा चव्हाण उपाध्यक्ष रवि भावड, नवापुर तालुका अध्यक्षपदी रमेश भोई, उपाध्यक्ष अंबादास आतारकर, शहादा तालुका अध्यक्षपदी राजेंद्र जाधव, धडगाव तालुकाध्यक्षपदी रमण ढोले, उपाध्यक्ष प्रल्हाद तमखाने सचिव लतेश मोरे तसेच शहादा शहर अध्यक्षपदी सुरेश वाडीले सचिव लव लोहार, यांसह दत्तु सुळ, रवि बेलदार, सिताराम भोई, यांचाही कार्यकारीणीत समावेश करण्यात आला. जिल्हा युवा आघाडीपदी रवि गोसावी, शिक्षक आघडीपदी रविंद्र वानखेडे, जिल्हा प्रसीध्दी प्रमुख गणेश शिवरे यांची निवड करण्यात आली.यावेळी गणेश ढोल, राजेंद्र मोरे, बाबा आव्हाड, अनिल परदेशी, चिंगा शिनदे, साहेबराव तिरमले, दिपक मोरे, संदीप भोई, शिवदास साटोटे, यांचेसह संपुर्ण जिल्ह्यातील प्रमुख जाती प्रवर्गातील प्रतिनिधीं उपस्थीत होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंकज शिवदे, ईश्वर जोशी, जगदीश साठे, चंदर खेडकर यांनी सहाय्य केले.प्रास्ताविक व सुत्र संचलन मनोज चव्हाण यांनी तर आभार राकेश तमायचेकर यांनी मानले. राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!