Type to search

नंदुरबार

नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 28 जुलैला सत्कार

Share

कळंबू । वार्ताहर- नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक संस्था व कर्मचारी संस्थेमार्फत सालाबादाप्रमाणे दिनांक 28 जुलै 2019 रोजी सकाळी दहा वाजता श्रॉफ हायस्कूल नंदुरबार येथे नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा नाभिक समाज हितवर्धक संस्था व कर्मचारी संस्थेमार्फत सालाबादाप्रमाणे दिनांक 28 जुलै रोजी श्रॉफ हायस्कूल येथे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका संचालक मंडळाकडे जमा करावी, समाजातील आपल्या पाल्याचे समाजातील आयएएस, आयपीएस, शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते ट्रॉफी, प्रशस्तीपत्र, व बक्षीस देण्यात येणार आहे. त्यासाठी दहावीच्या विदयार्थ्यांसाठी 70 व बारावी साठी 60 टक्के पुढील गुण प्राप्त विदयार्थी बक्षीस पात्र राहतील.

तसेच उच्च शिक्षण घेणारे व क्रिडा प्रकारात जिल्हास्तरीय यश प्राप्त खेळाडू बक्षीस पात्र राहतील . सर्व बक्षीस प्राप्त विदयार्थी व खेळाडू यांनी आपली गुणपत्रिका व मोबाईल नंबर संचालकांकडे वीस जुलै पर्यंत जमा करावेत. आठवी पासून पुढील विदयार्थी व पालकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, करिअर गायडन्स बाबतीत अधिकारी मार्गदर्शन करतील, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, समाजातील दानशुर व्यक्तीना आवाहन करण्यात येते की ज्यांना विद्यार्थ्यासाठी ट्रॉफी दयायची असेल त्यांनी संचालक मंडळाकडे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!