Type to search

नंदुरबार

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेबाबत आवाहन

Share

नंदुरबार । येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्त नंदुरबार, शहादा, नवापूर या तीन तालुक्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना लागू असून बारावीनंतर पुढे शिक्षण घेणार्‍या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी योजनेचा लाभ घेण्यासाठी हीींिीं://ीुरूरा.ारहरेपश्रळपश.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर अर्ज भरू शकतात. आदिवासी विकास विभागाने 27 नोव्हेंबर 2018 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार सदर योजना ही तालुकास्तरावरील सर्व मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रभुत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेऊन शिक्षण घेणार्‍या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना लागू झालेली आहे. अशा शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशित विद्यार्थी या योजनेमध्ये अर्ज भरू शकतात.

बारावीनंतरचे सर्व अभ्यासक्रमांचा निकाल लागल्यापासून एक महिन्याच्या आत संकेतस्थळद्वारे ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी. नवीन विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर अर्ज भरण्याकरीता प्रथम नोंदणी करावी. नाव नोंदणीनंतर प्राप्त युजर आयडी व पासवर्डचा उपयोग करून अर्ज भरावा. योजनेमध्ये अर्ज भरण्यासाठी होस्टेल अ‍ॅडमिशन किंवा स्वयंम या पैकी स्वयंम हा पर्याय निवडून काळजीपूर्वक अर्ज भरावा. जे विद्यार्थी सन 2018-19 पासून योजनेमध्ये प्रवेशित आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी देखील सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात देखिल (जुने विद्यार्थी म्हणून) रिन्यु अ‍ॅडमिशनमध्ये अर्ज भरावा. सदर योजनेचा लाभ विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बॅक खात्यामध्ये थेट वर्ग करण्यात येत आहे.

त्यामुळे विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी फसवणूक केल्याचे आढळल्यास संबधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था व्याजासह वसुलीस व कायदेशिर कारवाईस पात्र राहतील, असे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी वान्मती सी. यांनी कळविले आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी असे सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!