Type to search

Breaking News नंदुरबार मुख्य बातम्या

अक्कलकुवा पोलीस उपअधीक्षकपदी हिंद केसरी खिताब विजेते विजय चौधरी

Share

नंदुरबार । प्रतिनिधी- राज्यातील पोलीस उपअधीक्षक संवर्गातील 101 अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश आज पारित करण्यात आले. अक्कलकुवा येथील पोलीस उपअधीक्षकपदी हिंद केसरी खिताब विजेते विजय नथ्थू चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त संवर्गातील 101 अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश आज गृह विभागाने काढले आहेत. यात नंदुरबार जिल्हयातील अक्कलकुवा येथील पोलीस उपधीक्षकपदी तीन वेळा महाराष्ट्र केसरी खिताब पटकावून इतिहास निर्माण करणारे प्रसिद्ध मल्ल विजय नथ्थू चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुळचे जळगाव जिल्हयातील चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील ते रहिवासी आहेत. श्री.चौधरी हे सध्या पुणे येथील ग्रामीण विभागात परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचा परिविक्षाधिन कालावधी संपला असून त्यांची नियमीत पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची प्रथम नियुक्ती नंदुरबार जिल्हयातील अक्कलकुवा येथे करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!