Type to search

Breaking News नंदुरबार मुख्य बातम्या

नंदुरबार जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची पुणे येथे बदली, डॉ.राजेंद्र भारुड नवे जिल्हाधिकारी

Share

नंदुरबार | येथील जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्या आयुक्तपदी बदली झाली असून त्यांच्या जागी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री.मंजुळे यांची २० फेब्रुवारी रोजी नंदुरबार जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. चारच महिन्यात त्यांची पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.भारुड हे धुळे जिल्हयातील साक्री तालुक्यातील सामोडे या गावातील मुळ रहिवासी आहेत. ते २०१३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी म्हणून डॉ.भारुड यांची ही पहिलीच नियुक्ती आहे. श्री.मंजुळे यांची चारच महिन्यापुर्वी नंदुरबार जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली होती. त्यांच्या या अल्पनियुक्तीबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी वान्मती सी यांची धुळे येथे बदली
दरम्यान, नंदुरबार येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी वान्मती सी यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!