Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारभांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई यांना लोखंडी रॉडने...

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई यांना लोखंडी रॉडने मारहाण; चौघांना अटक

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार येथे मुख्यमंत्र्यांचे बंदोबस्तासाठी आलेले पोलीस परतत असतांना धुळे-सुरत महामार्गावर ट्रकचालक व नागरीकांमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई यांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथे दि.१५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांचा दौरा आयोजीत करण्यात आला होता. त्यासाठी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. मात्र त्यांचा दौरा काही कारणास्तव रद्द झाल्याचे दि.१४ फेब्रुवारी रोजी माहिती झाल्याने बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीसांना परत पाठविण्यात आले.

नंदुरबार येथून बंदोबस्तावरून परत नवापूरकडे जात असतांना नवापूर तालुक्यातील धुळे-सुरत महामार्गावर ट्रकचालक उपेंद्रकुमार बंद्रीप्रसाद व कमललाल आवश्या कोकणी व त्याचे सहकारी यांच्यात वाद सुरू असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज महाजन व पोलीस शिपाई जितेंद्र नामदेव चव्हाण हे वाद सोडविण्यासाठी गेले असतांना संशयीत अधिकार्‍यांशी हुज्जत घालत शिवीगाळ करून धक्काबुक्की करून व लोखंडी रोड लाकडी डेंगार्‍याने मारहाण केली व शासकीय कर्तव्यात अडळाथ निर्माण केला.

या मारहाणीत सहायक पोलीस निरीक्षक धिरज महाजन व पोशि. जितेंद्र नामदेव चव्हाण, ट्रक चालक उपेंद्रकुमार बद्रीप्रसाद राव रा.डाताकुरूम ता. फुलछुवा (देवघर, झारखंड) हे जखमी झाले आहे. याप्रकरणी पोशि जितेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कमनलाल आवश्या कोकणी, राकेश चिमणलाल कोकणी, रमणलाल आवश्या कोकणी, विकास कमनलाल कोकणी सर्व रा. कोठडा पिंजरानाला (ता.नवापूर) यांच्याविरूध्द नवापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५३, ३३३, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांना पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि डी.एस.शिंपी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या