Type to search

नंदुरबार

पर्यावरणाच्या रक्षणसाठी लाकडाऐवजी शेणाच्या गोवर्‍यांनी केले अंत्यसंस्कार

Share

प्रकाश खैरनार
नवापूर । पर्यावरणाच्या रक्षणासाठी अंत्यविधीसाठी लाकडाऐवजी शेणांच्या गोवर्‍यांचा वापर करुन येथील अग्रवाल परिवाराने चांगला पायंडा पाडला आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

येथील सुभाषचंद्र अग्रवाल हे प्रतिष्ठित व्यापारी व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. शहरातील मुख्य रस्त्यावर त्यांचे कापडाचे तसेच कृष्णा आईसक्रीम नावाचे दुकान होते. नेहमीच हसतमुख राहणार्‍या सुभाष अग्रवाल यांचे मंगळवारी निधन झाले. यावेळी त्यांचे पुत्र समीर व कल्पेश यांनी आपल्या पित्याच्या अंत्यसंस्कार लाकडाचा वापर न करता शेणाच्या गोवर्‍यांमध्ये करण्याची इच्छा समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व परिवाराचे सदस्य आणि नातेवाईकांकडे व्यक्त केली. या सर्वांचा होकार मिळाला.

कारण यामुळे पर्यावरण रक्षण होईल व एक नवा उपक्रम राबवून जनजागृती होईल, हा हेतू होता. आपल्या पित्याच्या अंत्यसंस्कारसाठी फक्त 600 शेणाच्या गोवर्‍यांमध्ये अंत्यसंस्कार केल्याने तीन गोष्टी प्रामुख्याने उपस्थितांच्या लक्षात आल्या. या निर्णयामुळे वृक्षतोड होणार नाही. प्रदूषण नियंत्रण होईल व अंत्यसंस्कारासाठी 3 ते 4 क्विंटलपर्यंत लाकडाचा उपयोग होतो. ज्याचा खर्च 3 हजारापर्यंत आहे. परंतु शेणाच्या गोवर्‍या फक्त 600 लागल्या त्यांची किंमत दीड हजार होती. राखदेखील नदी साफ करायला उपयोगी पडते. म्हणून लाकडाऐवजी शेणाच्या गोवर्‍यांमध्ये अंत्यसंस्कार केल्याने पर्यावरण रक्षण होते व आर्थिक बचत देखील होते. म्हणून या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!