Type to search

नंदुरबार

शिरीषकुमार नाईक यांनी स्वखर्चाने खोदली कुपनलीका

Share

नवापूर । नवापूर शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असुन टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणी परिस्थिती पाहता नवापूर शहरात आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन शिरीषकुमार नाईक यांनी त्यांचा स्वखर्चाने महाराणा प्रताप चौक येथे कुपनलीका खोदुन दिली असुन अनेक प्रभागात त्यांनी पाण्याची व्यवस्था करुन दिली आहे .

नवापूर येथे कुपनलीका करण्याचा शुभारंभ प्रसंगी न.पा पाणीपुरवठा सभापती अरुणा पाटील,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील,माजी नगरसेवक संजय राणा,विजय पाटील,रविंद्र पाटील,गोरख पाटील,विशाल पाटील,दर्शन पाटील,राजेश जयस्वाल,अनिल पाटील,भरत पाटील,विशाल वाघ,जिग्नेश पाटील, कोकीला पाटील, मालती पाटील,सध्या पाटील,कल्पना पाटील, सुशिला तायडे,पुनम तायडे,सविता तायडे,पुनम मरसाळे,कलाबेन राणा,चंदबेन राणा,सुनिता तायडे,आदी उपस्थित होते.यावेळी बोरींग करऩे कामाचा प्रसंगी पुजन व श्रीफळ फोडुन आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन शिरीषकुमार नाईक व पाणीपुरवठा सभापती अरुना पाटील यांनी शुभारंभ केला नवापूर शहरात पाण्याची दिवसें दिवस भीषणता वाढत असुन अनेक भागात बोरींग सुध्दा आटले आहे.या करता स्वता शिरीषकुमार नाईक यांनी पुढाकार घेऊन महाराणा प्रताप चौक भागात बोरींग करुन दिले यामुळे या भागात पाण्याची समस्या दुर होणार आहे.परिसरातील लोकांनी शिरिषकुमार नाईक यांनी यांचे आभार मानले असुन समाधान व्यक्त केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!