Type to search

नंदुरबार

नवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव

Share

नवापूर । नवापूर शहरात वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांना त्यांच्या दालनात भारतीय जनता पार्टीतर्फे घेराव घालण्यात आला. तर शिवसेनेतर्फे त्यांना बेशरमची फुले देण्यात आली.

शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे पाणी प्रश्न गंभीर होत आहे. आज मुख्यधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नवापूर नगर परिषदेमध्ये भोंगळ कारभार सुरु आहे. दरवर्षी पाणी पुरवठयाबाबत शून्य नियोजन होत असते. दरवर्षी मार्च महिन्यापासून सुरु होणारी पाण्याची अडचण नदीला पाणी येत नाही तोपर्यंत सुटत नाही. परंतु नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात तांत्रिक अभियंता नसल्यामुळे पाणीपुरवठा कर्मचार्‍यांंच्या भरवश्यावर आहे. शहराच्या अनेक भागात ज्या ठिकाणी नगराध्यक्ष, नगरसेवक, पालिका कर्मचारी राहतात, त्या ठिकाणी नियमित व सुरळीत पाणीपुरवठा होत असतो. मात्र, शास्त्रीनगर, जनता पार्क, मंगलदास पार्क, लिमडावाडी, कुंभारवाडा, नारायणपूर रोड, धडधडया फळी, तिनटेंबा, भरवाडफळी, आमलीफळी भागात नियमित मार्चनंतर पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे उपरोक्त भागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. नगर परिषदेने वरीष्ठ पातळीवर चर्चा करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तांत्रिक अभियंत्यांची तात्काळ नियुक्ती करावी किंवा तात्पुरत्या स्वरुपात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नियुक्ती करण्यात यावी आणि नवापूर शहराला पाणी पुरवठा सुरळीत करुन मिळावा. आठ दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास मुख्याधिकार्‍यांना त्यांच्या दालनात दि.26 जून रोजी कार्यालयीन वेळेत घेराव घालण्यात येईल. कायदा व सुव्यवस्थेत बाधा निर्माण झाल्यास याची पालिकेची राही, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल वसावे, जिल्हा चिटणीस शैला टिभे, सरचिटणीस बाबा वाणी, रोशन वसावे, शहराध्यक्ष निलेश प्रजापत, सुनिता वसावे, आनंद वाघ, शिवसेनेचे गणेश वडनेरे, शाहरुख खाटीक, अनिल वारुळे, जहुर खान, सुनिल पवार, तौशीफ मन्सुरी, जे.एस.अग्रवाल, शरद लोहार, सुभाष गावीत, कमलेश छत्रीवाला, कलीम पठाण, लालजी अहिरे आदींच्या सह्या आहेत.

शिवसेनेनी मुख्याधिकार्‍यांना दिली बेशरमची फुले
भाजपाच्या आंदोलनानंतर पालिकेत शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख गणेश वडनेरे यांनी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांना धोतरा व बेशरमची फुले देऊन सत्कार केला व निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी पदावर विराजमान झाल्या दिवसापासून प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे व पाण्यासारख्या विषयासंदर्भात कुठलेही नाविन्यपुर्ण काम व शासनाच्या नवनवीन योजनांच्या आधारे व आपल्या बुध्दीकौशल्याने पाण्याचा स्त्रोत वाढावा व दुष्काळाचा सामना करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केलेली नाही. शहरातील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवले आहे. शासनाच्या कोणत्याच नियमांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. शौचालय-बाथरुम, अतिक्रमण हटविणे, तसेच अवैध व्यापारी संकुल मालकांना जनसुविधा न देता शौचालय,बाथरुम,पार्कींग आदी बांधकामाची मंजुरी घेतवेळी दर्शविण्यात आले होते परंतु सदर सेवा देत नसलेल्या संकुलांवर संबंधित विभागाकडून कार्यवाहीचे आदेश प्राप्त होऊन देखील मुख्याधिकार्‍यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे मुख्याधिकार्‍यांना धोतरा व बेशरमची फुले देण्यात आली. निवेदनावर शिवसेनेचे गणेश वडनेरे यांची सही आहे.

नवापूर नगरपालिकेत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिपक पाटील, पो.कॉ. योगेश थोरात, महेंद्र नगराळे, कृष्णा पवार, अमित शेवाळे, निजाम पाडवी, मोहन साळवे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!