Type to search

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे आझाद मैदानावर आंदोलन

नंदुरबार

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे आझाद मैदानावर आंदोलन

Share

नवापूर | प्रतिनिधी –

महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई विभागीय शिक्षक संघटनेकडून आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक मोठ्या संख्येने आपल्या युनिटसोबत उपस्थित होते. शासनाने शिक्षक महासंघाला दिलेल्या लेखी आश्वासनांची पूतर्ता न केल्याने हजारो शिक्षक देशोधाडीला लागले आहे. १५/१६ वर्ष सेवा करूनदेखील वेतनापासून वंचित ठेवण्यात आले आहे. सरकारला जाब विचारण्याची व आपले प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापुर्वी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रमुख  मागण्यांसह मोठ्या संख्येने आझाद मैदानावर आंदोलनासाठी उपस्थित होते.

२००३ ते २०११ पर्यंतच्या व्यपगत  केलेल्या वाढीव पायाभूत पदांना मंजूरी देण्यात यावी, २०१२ ते २०१८ पर्यंतच्या वाढीव पायाभूत शिक्षकांना ताबडतोब नेमणूक दिनांकापासून मान्यता व वेतन देण्यात यावे. आयटी विषय शिक्षकांना मान्यता व वेतन देण्यात यावी. विना अनुदानित तुकड्यांना १०० टक्के अनुदान देण्यात यावे व शिक्षकांचे वेतन सुरू करण्यात यावे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा लागू करण्यात यावी. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. उपस्थित शिक्षकांनी आपल्या समस्यांना वाचा फोडली.

शासनाला धारेवर धरले. आंदोलनात मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सचिव प्रा.मुकुंद अंधळकर, मुंबई विभागीय संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रकाश दिक्षीत, खजिनदार प्रा.मणी, ठाणे/पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा.दत्तात्रय चितळे, प्रा.सुनिल पुर्णपात्रे, सचिव प्रा.सुरेश अहिरे, सल्लागार प्रा.प्रकाश माळी यांच्यासह नंदुरबार, धुळे, उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, नांदेड, बीड, लातूर, पुणे, जळगाव, नागपूर, अकोला, कोल्हापूर जिल्हयातील शेकडो शिक्षक उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!