नंदुरबार-नाशिक बस चालकास मारहाण; बसच्या काचा फोडल्या; तक्रार दाखल

0

नाशिक | वाहनाला कट मारल्यामुळे नंदुरबार-नाशिक बसच्या चालकाला अज्ञात संशयितांनी मारहाण केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास कातरवेलजवळ घडली. इंडिगो कारमधून आलेल्या अज्ञात संशयितांनी यावेळी बसच्या काचाही फोडल्या. याप्रकरणी जायखेडा (ता.बागलाण) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव डेपोची बस विंचूर प्रकाशा महामार्गावरून नंदुरबारहून नाशिककडे प्रवाशी घेऊन जात होती. पिंपळनेर-ताहाराबाद रस्त्यावरील कातरवेलजवळ टाटा इंडिगो वाहनाला कट मारला म्हणून बस थांबवून दोन्ही संशयितांनी  बस चालक आणि वाहकासोबत वाद घातला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. तसेच दोघा संशयितांनी बसचे नुकसानदेखील केले.

दरम्यान, बसचालक संदीप येवले रा.वालखेडा, ता.शिंदखेडा जि.धुळे यांनी दोघे अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

*