पारंपारीक प्रश्न बदलण्यासाठी माणसाने बदल स्विकारणे आवश्यक

0
नंदुरबार । दि.28 । प्रतिनिधी-प्रत्येक क्षेत्रात बदल घडतो आहे.या बदलांसोबत आपले पारंपारीक प्रश्नही बदलले पाहिजे. माणसाने बदल स्विकारला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी येथे केले.
शासनाने आता रेशनचे धान्य वितरणप्रणाली बदलली पॉस यंत्राद्वारे आता धान्य वितरण केले जाणार आहे. त्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना पॉस यंत्र वितरणाचा कार्यक्रम नुकताच जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांच्या हस्ते झाला.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विजयकुमार भांगरे, सहाय्यक पुरवठा अधिकारी रामचंद्र पवार, अरविंद गावीत उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना डॉ.कलशेट्टी म्हणाले, रेशन वितरण प्रणाली ही आता हायटेक होत आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रणालीद्वारे कामकाज सुरू झाले आहे.

ग्रामीण बागायती गरीब माणसाला त्याचा हक्क मिळावा, त्याचे धान्य मिळावे. या मागचा हा हेतू आहे. त्यामुळे ही प्रणाली प्रत्येकास स्विकारावीच लागणार आहे.

ज्या रेशन दुकानधारकांनी चांगले काम केले. त्यांना शासनाच्या इतर उपक्रमांतरही सहभागी करून घेण्याचा मानस आहे. त्यामुळे चांगले काम का पुढे त्याचा लाभ हा ेणार आहे.

दुकानदारांना घरपोच धान्य मिळत आहे. त्यांनी गरीब कुटूंबालाही धन्य द्यावे. ऑगस्टपासून या यंत्रणेची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.

त्यातून सुटका नाही. त्यामुळे व्यापारी दृष्टीकोनातून नव्हे तर समाजसेवेचा एक भाग म्हणून जनतेची सेवा करा, राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हाव, असे सांगितले.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी भांगारे यांनी पॉस मशिनचा उपयोगाबाबत माहिती दिली. तर ओसिस कंपनीचे जनरल मॅनेजर रामलिंगा रेड्डी, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयसुदन एस., प्रकलप अधिकारी नजर बागवाने यांनी प्रात्यक्षिक करूणन दाखवले.

जिल्ह्यात एकूण 1057 रेशन दुकानदार आहेत. त्यापैकी 955 जणांना हे पॉस मशिन वितरीत करण्यात आले. त्यात नंदुरबार तालुका 171, तळोदा 98, शहादा 195, धडगांव 159, नवापूर 196, अक्कलकुवा तालुक्यात 184 रेशन दुकानदारांना पॉस मशिन वाटप करण्यात आले. त्याचे प्रात्यक्षिक व त्याविषयीच्या शंकांचे निरसनही यावेळी कंपनीच्या अधिकार्‍यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*