तीन पालिकांच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

0
नंदुरबार । दि.17 । प्रतिनिधी-नंदुरबार, नवापूर व तळोदा पालिका सदस्यांची मुदत डिसेंबरला पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रभागरचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
यावर्षी होणार्‍या तळोदा पालिका निवडणूकीसाठी प्रभाग रचना ही गुगल पद्धतीने होणार असून त्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हयातील तळोदा, नंदुरबार व नवापूर येथील नगरपालिकांची मुदत डिसेंबरला संपत असून त्यादृष्टीने प्रभाग रचना निश्चित करणे तसेच हरकती मागविणे व विविध प्रभागातील आरक्षण काढण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
यंदा थेट मतदारांना नगराध्यक्ष निवडण्याची संधी मतदारराजाला मिळणार आहे, त्याचबरोबर ही निवडणूक प्रभागनिहाय होणार आहे त्यासाठी 2012 च्या जनगनेनुसार प्रभाग निवडले जातील.

मात्र हे प्रभाग निवडतांना पूर्वी कर्मचारीच प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग अथवा वार्ड ठरवत आता मात्र गुगलच्या माध्यमातून प्रभाग ठरणार असल्याने ते कसे असतील याकडे इच्छुक उमेदवार व मतदार राजाचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाकडून या तीनही पालिकेत गुगलच्या माध्यमातून आरक्षण प्रारूप प्रभागरचना तयार करणे, हरकती व सूचनांवरील सुनावणी घेणे व अंतिम प्रभाग रचना जाहीर करणे असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

प्रभागरचना कार्यक्रम असा-दि.15 जुलै रोजी प्रभागनिहाय आरक्षण सोडत नोटीस प्रसिद्धी करणे, दि.20 जुलै रोजी नगरसेवक पदासाठी आरक्षणाची सोडत, दि.5 ऑगस्ट रोजी प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी.

 

LEAVE A REPLY

*