Type to search

Breaking News नंदुरबार

खून प्रकरणात साक्षीदारच निघाला मारेकरी

Share

बामखेडा – 

बामखेडा येथील कलाबाई दयाराम गवळे (वय 52) यांच्या खूनप्रकरणी ज्या साक्षीदाराने पोलीसांना खबर दिली होती, त्याच साक्षीदाराला अटक करण्यात आली असून त्याने खून केल्याची कबुली पोलीसांना दिली आहे.

दि. 11 रोजी कलाबाई दयाराम गवळे या घरातून शेती कामासाठी गेल्या असता परतल्या नाहीत. कुटुंंबियांनी त्यांचा शोध घेतला असता शहादा शिरपूर राज्य महामार्गावरील एका शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यू व त्यानंतर अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यात काहीतरी घातपाताचा संशय असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात होते. या घटनेने अगोदर अनरद टेकडीलगत एका युवकाचा देखील खून झाल्याची घटना घडलेली आहे. त्यामुळे पोलिसांपुढे या तपासाच्या एक मोठे आव्हानच होते. पहिला झालेल्या युवकाच्या खुनाचा तपास लागत नाही तोच बामखेडा गावालगत महिलेच्या खून होतो. यामुळे जिल्हा प्रशासन हादरून गेले होते. कलाबाई गवळे यांच्या खुनानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवले.

हा खून वेडसर व्यक्तीने केल्याच्या चर्चा रंगवल्या जात होत्या. मात्र शहादा डीवायएसपी सपकाळे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. खून झाल्यानंतर नंदुरबार येथुन श्वान पथक देखील मागवण्यात आले होते. श्री.सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सारंगखेडा येथील पोलिस निरिक्षक चंद्रकांत सरोदे हे तपास करत होते.

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, नंदुरबार अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,पोलीस उपअधीक्षक पुंडलिक सपकाळे सारंगखेडा पोलीस निरीक्षक सरोदे यांच्यासमोर तपासाचे आव्हान उभे राहिले होते. सपकाळे यांनी बामखेडा पोलीस पाटील डॉ.योगेश चौधरी यांच्या सहकार्याने अपघाताबाबत विस्तृत चर्चा केली होती. हा गुन्हा ज्याने उघड केला त्यास आपण पन्नास हजार रुपये बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आले.

ही चर्चा पुर्ण गावभर पसरली. त्यात रोज बकर्‍या चारायला जाणार्‍या 35 ते 40 वर्षीय युवकाने पोलीस पाटलांना येवून घडलेली घटना वर्णन केली. त्याच्या म्हणण्यानुसार तो बकर्‍या चारण्यास गेला असता त्याला लक्षात आले की येथे काहीतरी घडते आहे. मयत वृध्देचा पती याने जादूटोणा करणार्‍या इसमाचा साहाय्याने त्या वृध्द महिलेस ताईत बांधण्यास प्रवृत्त करत होते. पण ती त्याला नकार देत असल्यानेच त्या ताईतच्या माध्यमातून तिचा गळा आवळण्यात आला. हे त्या बकरी चारणार्‍या इसमाने पाहिले की काय म्हणून त्याला बोलावून त्यांनी दमदाटी केल्याने तो युवक दशहतीत होता.

तीन चार दिवसापासून उपाशी व शिवाय दशहतीत होता. परंतु पोलीस उप अधिक्षक व पोलीस पाटील यांच्या आवाहनाने त्याने सर्व घटना पोलीस पाटलास सांगितली.  या दोघांचा सतर्कतेने व चाणाक्षपणामुळे फिर्यादीच आरोपी असल्याचे सिध्द झाले. बामखेडा गावालागत  झालेल्या कुणाची  तपासणी  ग्रामस्थ पोलिस पाटील यांच्या सहकार्याने उघडकीस आलेली आहे.

कुठल्याही घटनेत पोलीस पाटील सरपंच व ग्रामस्थ यांच्या सतर्कपणामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू शकत नाही,  हे या घटनेवरून स्पष्ट होते. या दोघा संशयितांना पकडल्यावर दोघा संशयितांना दि.16 नोव्हेंबर दि.19 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती मात्र या पाच दिवसात त्यांनी गुन्हा कबूल केला नाही.

तपासणीत त्यांच्याकडुन काहीही निष्पन्न न झाल्याने त्यांची सुटका करण्यात आली. सारंगखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दुसर्‍या दिशेने तपास सुरू केला. छोटू आधार काकडे  हा परत परत पुन्हा पुन्हा पोलीस ठाण्यात संशयीतांबाबत विचारणा करत असल्याने संशयाची सुई त्याच्याकडे वळविण्यात आली.

त्याला संशयावरून ताब्यात घेतले असता, त्याने बाजरीच्या कणसाचे पोते डोक्यावर चढवुन देण्याच्या बहाण्याने कलाबाइंना आडोशात आणून तेथे गळा दाबुन खुन केल्याची कबुली दिली.

माहितगार छोटू ठाकरे काकडे याने त्या दोघा संशयित दाजी ठाकरे व फिर्यादी दयाराम गवळे यांच्याबाबत काल्पनिक कथा बनवली व त्यांना प्रकरणात फसवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

खूंन का करण्यात आला आहे हा प्रश्न अजुनही सुटलेला नाहीय. अजुनही या कृत्यात तो एकटा होता की आणखी कोण होते हेदेखील गुलदस्त्यातच आहे.आधार काकडे याला ही काल्पनिक कथा बनण्याचा सल्ला देणारा खरा दिग्दर्शक कोण हादेखील प्रश्न आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे करीत आहेत.

 

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!