Friday, April 26, 2024
HomeUncategorizedअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून

अनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून

नंदुरबार –

नवापूर तालुक्यातील लक्कडकोट वडफळी येथे अनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा कुर्‍हाडीने वार करून खून केल्याची घटना घडली.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील लक्कडकोट वडफळी येथे राहणार्‍या सुभाष रूपसिंग गावीत (50) याचे अमृत बाबु गावीत याच्या पत्नी सोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयाने कारणावरून अमृत बाबु गावीत याने सुभाष गावीत याच्या डोक्यात कुर्‍हाडीने मारहाण केली.

यात सुभाष गावीत यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मारथाबाई सुभाष गावीत रा. लक्कडकोट वडफळी ता.नवापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात अमृत बाबु गावीत रा. लक्कडकोट वडफळी ता.नवापूर याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीसांनी अमृत बाबु गावीत याला अटक केली आहे. पुढील तपास सपोनी डी.एस.शिंपी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या