सलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड

दिग्विजय सेवाभावी प्रतिष्ठानचा उपक्रम

0
मोदलपाडा । वार्ताहर- दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संंस्था, शाळा, महाविद्यालये यांच्यातर्फे वृक्षारोपण केले जाते ,यानिमित्ताने मोठा गाजावाजा केला जातो. मात्र वृक्षलागवड केल्यानंतर त्यांचा संगोपनाकडे बरेचजण दुर्लक्ष करतात मात्र दिग्विजय सेवाभावी प्रतिष्ठानचे पदाधिकारी याला अपवाद ठरले आहे.त्यांनी सलाईनद्वारे पाणी देऊन वृक्ष वाचवण्याची धडपड सुरू केली आहे.

उन्हाच्या झळा वाढत असल्याने झाडे पाण्याअभावी होरपळत आहेत.अनेक झाडे अखेरची घटका मोजत आहेत यासाठी झाडांना पाण्याची गरज लक्षात घेता वृक्षप्रेमींनी विविध क्लृप्त्या लढविल्या आहेत. काही ठिकाणी सलाईनद्वारे तर काही ठिकाणी स्वखर्चाने टँकरद्वारे पाणी देऊन शहरातील वृक्ष वाचविण्याचा खटाटोप सुरु आहे.तसेच पशुपक्ष्यांकरिता पाण्याची व्यवस्था करा,दुष्काळी परिस्थितीत पाणी जपून वापरा असे विविध संदेश देणारे पोस्टर लावून वाटसरूंना पर्यावरण वाचवण्याची विनंती ही केली आहे.

यावेळी निसर्गसेवक दिग्विजय माळी म्हणाले की, प्रत्येक गोष्टींसाठी शासनाचा भरोसे न राहता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने निसर्गदेवतेची सेवा करून आपले कर्तव्य पार पाडावे. यावेळी दिग्विजय प्रतिष्ठानचे सौरव शुक्ला,उमेश पाडवी,सागर जावरे,तुलशीदास पानपाटिल,मंगेश पटेल आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*