Type to search

Breaking News नंदुरबार विधानसभा निवडणूक २०१९

नंदुरबार : ९ महिन्याच्या गर्भवती महिलेने केले मतदान

Share

मोदलपाडा (ता.तळोदा) वार्ताहर

मतदानाचा हक्क बजावणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. मात्र काहीजण हे कर्तव्य न बजावता त्या दिवसाचा वेळ इतर कामासांठी वापरतात. अशा नागरिकांनी तळोदा येथील तमन्ना मंसुरी या महिलेचा आदर्श घेण्याची गरज आहे.

तमन्ना मंसुरी या नऊ महिन्यांच्या गर्भवती असतानाही त्यांनी मतदान केले. दरम्यान, मतदान करणे हे लोकशाहीतले महत्वाचे कर्तव्य आहे. सर्वानी आपला मताधिकार बजावणे गरजेचे आहे. त्यामुळे मी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मतदानासाठी आल्याचे तमन्ना मंसुरी यांनी दै देशदूत शी बोलतांना सांगितले.

लोकशाहीतले महत्वाचे कर्तव्य आहे
सर्वानी आपला मताधिकार बजावणे गरजेचे आहे. त्यामुळे मी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मतदानासाठी आल्याचे या गर्भवती महिलेने सांगितले.

फोटो- चेतन इंगळे

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!