आ.रघुवंशी यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

0
नंदुरबार । येथील आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर आज यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. विख्यात डॉ.महंमद रेला यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी 10.30 वाजता शस्त्रक्रिया सुरु करण्यात आली. सुमारे 10 तास शस्त्रक्रिया चालली, अशी माहिती अ‍ॅड.राजेंद्र रघुवंशी यांनी दिली.

अ‍ॅड.रघुवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आ.रघुवंशी यांच्यावर आज यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना सुमारे 15 दिवस आय.सी.यु. मध्येच रहावे लागणार असून त्यानंतर 2 महिन्यांपर्यंत कुणालाही भेटता येणार नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही अ‍ॅड.रघुवंशी यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*