Type to search

आ.चंद्रकांत रघुवंशी यांचे नंदनगरीत जल्लोषात स्वागत

maharashtra नंदुरबार

आ.चंद्रकांत रघुवंशी यांचे नंदनगरीत जल्लोषात स्वागत

Share
नंदुरबार । येथील आ.चंद्रकांत रघुवंशी यांचे यकृताच्या प्रत्यारोपणानंतर प्रथमच नंदनगरीत आगमन झाल्याने त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

आ.रघूवंशी हे गेल्या आठ महिन्यांपासून यकृताच्या आजारामुळे चेन्नई येथे उपचार घेत होते. त्यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात येऊन त्यांचे यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. या शस्त्रक्रियेनंतर प्रथमच ते नंदनगरीत दाखल झाल्याने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरातील धुळे चौफुलीपासून त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठीकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. फटाक्यांची अतिषबाजी करण्यात येऊन ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. या मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी झाले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!