म्हसावद येथे गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात

0
म्हसावद । वार्ताहर – येथील नवीन प्लॉट भागातील गटारी तुडूंब भरून पाणी रस्त्यावर येत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याने नागरीकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
येथील प्लॉट भागातील सोमनाथ गुरव यांच्या घराजवळ बंद गटार तुडूंब भरल्याने संपूर्ण सांडपाणी हे रस्त्यावर येत आहे. याबाबत तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसून नागरीकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

संपूर्ण नवीन प्लॉट परिसरात गटारींच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी तक्रार करूनदेखील ग्रामसेवक हिंमत वंजारी यांच्याकडून कुठलीही ठोस उपाययोजना केली जात नाही.

यामुळे संपूर्ण रस्त्यावर घाण पाणी येत असल्याने दुर्गंधीचे वातावरण तयार झाले आहे. वरिष्ठांनी याची योग्य ती दखल घेवून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

*