म्हसावद परिसरात बिबट्यांचा मुक्तसंचार

0
म्हसावद, ता.शहादा । दि.27 । वार्ताहर-म्हसावद परिसरात बिबटयांचा मुक्तसंचार वाढल्याने शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरली आहे.
म्हसावद येथील किसन तुळशिराम सुर्यवंशी यांच्या शेताजवळून भरत चतुर पाटील हे शेतात जात असतांना त्यांना एक मादी व दोन पिलू असे तीन बिबटे दिसले.
त्यामुळे गावातील शेतकर्‍यांनी शेतात जातांना काळजी घेण्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर दुसर्‍या दिवशी दौलत परशराम ठाकरे यांच्या शेतात बिबटयांचे पायाचे ठसे दिसले.

त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यामध्ये व मजूरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबटयाचा बंदोबस्त कारावा अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

पाऊस सुरू झाल्यामुळे शेती कामांना वेग आला आहे. मात्र, बिबटयाचा वावर वाढल्याने मजूर व शेतकर्‍यांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून बिबटयाचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

*