Type to search

नंदुरबार फिचर्स

वृध्दाची तापीच्या पात्रात उडी घेवुन आत्महत्या 

Share
शहरात दोघांच्या आत्महत्या; १४ वर्षीय मुलाचा समावेश Latest News Nashik Two Suicide Today in City
दोंडाईचा-सारंगखेडा दरम्यान असलेल्या टाकरखेडा गावाच्या हद्दीत तापीच्या पुलावरून एका वृद्ध इसमाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास दोंडाईचा-सारंगखेडा दरम्यान टाकरखेडा गावाच्या हद्दीत असलेल्या तापी नदीच्या पुलावरून एका वृद्ध इसमाने उडी मारून आत्महत्या केली.
त्याच्या अंगात पांढरा शर्ट,  पांढरा पायजामा व खिशात दोंडाइचा  ते शिंदखेडा रेल्वेचे तिकीट आढळून आले आहे. सदर व्यक्तीसोबत लघवीची पिशवी टांगलेली होती.
त्यामूळे सदर मयत व्यक्ती हा कुठल्यातरी दवाखान्यात उपचार घेत असतानाच त्याने या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची शक्यता आहे. या इसमाचा मृतदेह मासेमारी करणा-यानी पाण्या बाहेर काढला.
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!