Type to search

नंदुरबार

मंदाणे परिसरात दमदार पाऊस; मंदाकिनी-सरस्वती नद्यांना पूर

Share

मंदाणे । वार्ताहर- मंदाणे परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला असून विहिरी तुडुंब भरल्या आहेत. घरांची पडझड झाली आहे. येथील मंदाकिनी व सरस्वती नद्यांना 2006 नंतर प्रथमच पूर आला आहे.

शहादा तालुक्यातील पूर्व भागातील मंदाणेसह परिसरात गेल्या पाच, सहा वर्षांपासून पुरेशा पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या दहा,बारा वर्षांपासून या भागात जोरदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे या भागातील धरणांसह नदी, नाले, विहिरी, कूपनलिका कोरड्या होऊन बंद पडल्या होत्या. परंतु गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. नदी,नाल्यांना पूर आले असून विहिरी, धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत. घरांची पडझड होत असून पिके पाण्याखाली आली आहेत. रस्ते वाहून गेले आहेत.

मंदाणे परिसरात गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसासह संततधार सुरु होती. परंतु मंदाणेसह परिसरात तसा समाधानकारक पाऊस आजपर्यंत झाला नव्हता. त्यामुळे या भागातील शेतकरी, नागरिक चिंतातुर झाला होता. पण या 48 तासांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील जनता सुखावली असली तरी अति पर्जन्यमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे जुनी घरे पडत असून भिंती कोसळत आहेत. तसेच शेतातील विहिरी भरत असून पीक मात्र पाण्याखाली आले आहेत.नदी, नाले, प्रकल्प तुडुंब भरून वाहत असून रस्ते मात्र पाण्यात वाहून गेले आहेत.

मंदाणे गावाला सुजलाम-सुफलाम करणार्‍या मंदाकिनी व सरस्वती या नद्यांना सन 2006 नंतर प्रथमच पूर आला.दोन्ही नद्यांचा उगम मंदाणे पासून 12-13 कि.मी.अंतराहून पूर्वेला असलेल्या सातपुड्यातील सटीपाणीच्या डोंगरभागातुन होतो. या नद्यांवर मंदाणेसह सटीपाणी, गोटाळी, लंगडी,चांदसैली, भोंगरा, घोडलेपाडा, तिधारे, टुकी,जवखेडा आदी गांवे वसलेली आहेत.येथील शेतकरी व नागरिक या नद्यांच्या पाण्यावर आपल्या जमीनी करीत असतात.परंतु गेल्या पाच, सहा वर्षांपासून पडलेल्या दुष्काळामुळे या परिसरात शेतकर्‍यांसह नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती.परंतु गेल्या 48 तासांच्या पावसामुळे ह्या नद्या तुडुंब भरून वाहू लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आपल्या गावाला व परिसराला सुजलाम-सुफलाम करणार्‍या या जीवनदायी नद्यांना तब्बल 13 वर्षांनी पूर आल्याने येथील प्रा.दिनेश पवार, ग्रा.पं.सदस्या रोहिणी पवार या दाम्पत्याने साडी,नारळ वाहून ओटी भरली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!