Type to search

नंदुरबार फिचर्स

युवकाच्या खूनप्रकरणी एकाला अटक

Share

नंदुरबार

शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील धरणात मध्यप्रदेशातील तरूणाच्या मृत्यूप्रकरणी पोलीसांनी एकास अटक केली आहे.

याबाबत पोलीस सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश येथील पानसेमल तालुक्यात बालझरी येथे राहणार्‍या महेश सिताराम पावरा (35) याच्यासोबत जालंदर गुमानसिंग पावरा रा.बालझरी (ता.पानसेमल) याचे दोन दिवसापुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून जालंदर याने महेश पावरा याचा खून करून लोंढरे येथील धरणाच्या पाण्यात फेकून दिले.

याप्रकरणी गोविंद हिरालाल पावरा रा.चिरखान (ता.शहादा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जालंदर गुमानसिंग पावरा याच्याविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी त्याला अटक केली आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोनि एल.के.नजन करीत आहेत. युवकाच्या हत्त्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!