महिला काँग्रेसतर्फे जिल्हा मेळावा

0
नंदुरबार । दि.27 । प्रतिनिधी-नंदुरबार जिल्हा महिला काँग्रेसतर्फे महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला ऑल इंडीया महिला काँग्रेस जनरल सेक्रेटरी नेहा डिसुजा तसेच प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अ‍ॅड.चारूताई टोकस, नंदुरबारचे निरीक्षक विमलताई बेडसे, संगिता बहिरम, महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा सौ.संगिता शेंडे आदी यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी नंदुरबार जिल्हा महिला काँग्रेसचे नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली व मागील वर्षीच्या कामकाजाचा आढावा देखील घेण्यात आला.

नवीन कार्यकारिणीत महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सौ.हिराताई विलास पाडवी यांची फेर नियुक्ती करण्यात आली. तसेच प्रत्येक तालुक्यात देखील महिला अध्यक्षांची निवड यावेळी करण्यात आली.

यावेळी संघटन मजबूत करावे व कार्यक्रमामध्ये महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व काँग्रेसचा प्रचार प्रसार करावा.

असे अवाहन यावेळी ऑल इंडीया महिला काँग्रेसच्या सेक्रेटरी नेहा डिसुझा तसेच यावेळी महिलांना 50 टक्के आरक्षण मिळावे. अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी जिल्ह्यातील महिला काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होत्या तसेच जि.प. अध्यक्षा सौ.रजनी नाईक, महिला आघाडी जिल्हा सदस्य संगिता गावीत, ज्योती जयस्वाल, पिनल शाह, संगिता वळवी, सुमन वळवी, प्रियंका अग्रवाल, अंजनाबाई वळवी, सुभद्राबाई वळवी, संगिता वळवी, अंजना वसावे, रोशन आरा व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*