Type to search

Featured नंदुरबार फिचर्स

मनाई आदेशाचे उल्लंघन ; 24 जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Share
संगमनेरातून जाणारे जनावरांचे 1 हजार किलो मांस पाथरेजवळ पकडले, Latest News Sangmner Crime News

नंदुरबार  – 

जिल्हाधिकार्‍यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हयातील एकुण 24 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हयात लागू केलेल्या सीआरपीसी 1973 चे कलम 144 (1) (3) चे उल्लंघन केल्याप्रकरणी अक्कलकुवा येथील फिरोज सत्तार मणियार, अक्कलकुवा येथील दिलीप नथमल जैन, विपूल सोनरात शिंपी, नवापूर येथील शेख बिलाल शेख इस्माईल, जुबेर मुसाली बुला, हंजला अफजल पठाण, सादअली मोहम्मद हवेलीवाला, खुलील भुला मोहम्मद, सिद्धक फारुख पठाण, जावेद कमालउद्दीन तेली, सुलोमोद्दीन कुतूबुद्दीन बेलदार, अल्ताफ मुसाजी बारडोलीया, जहीर सैय्यद, समीरशाह कलिमशहा, फारुख शेख आरिफ, निफाड जि.नाशिक येथील प्रविण गोविंद शिरसाठ, जळगाव जिल्हयातील बांभोरी येथील हेमंत सुशांत भदाणे, प्रविण रविंद्र पाटील, शेडावे ता.पारोळा येेथील गुलाब बुधा बिर्‍हाडे, भुषण बाळू पवार, नंदुरबार येथील धनराज राजेंद्र जाधव, शनिमांडळ येथील पंकज राजेंद्र पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सर्व आरोपी जिल्हाधिकार्‍यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करुन प्रवासी वाहतूक करतांना, संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरतांना, तर एका गावाहून दुसर्‍या गावाला परवानगी नसतांना वाहतूक करतांना आढळून आले. याबाबत संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!