‘ग्रंथालय-विद्येचे माहेर घर’ क्षेत्रभेट उपक्रम

0
नंदुरबार । प्रतिनिधी-येथील श्रीमती हि.गो. श्रॉफ विद्यालयाकडून शालेय उपक्रमांतर्गत क्षेत्रभेट म्हणून ‘ग्रंथालय-विद्येचे माहेर घर’ हा उपक्रम घेण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी ग.तु. पाटील महाविद्यालयातील ग्रंथालयाला भेट दिली. ग्रंथालयाची रचना त्यातील पुस्तके, ग्रंथ, मासिके, कादंबरी, आत्मचरित्र अशा विविध विषयांच्या पुस्तकांची माहिती व ग्रंथालयाचे महत्व जाणून घेतले.

तसेच महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा.डॉ.विनोद रघुवंशी यांनी ग्रंथालयाचे महत्व सांगून ग्रंथालयाची उपयोगिता या विषयी सखोल असे मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांना ‘लोकराज्य’ हे मासिक भेट म्हणून दिले.

तसेच ग्रंथालय पाहत असतांना तेथील महेश परदेशी व कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाविषयी उपयुक्त माहिती दिली. विद्यार्थ्यांनीदेखील ग्रंथालयातील विविध पुस्तकांची माहिती जाणून घेतली.

ग्रंथालय-विद्येचे माहेरघर हा उपक्रम शाळेतील शिक्षक अनिल मंडलिक यांनी ‘उपहार’ या पाठाचे विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान मिळावे या हेतूने राबविण्यात आला.

यासाठी नरेंद्र माळी यांचे सहकार्य लाभले. तसेच या उपक्रमाची शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुषमा शाह, उपमुख्याध्यापक नानाभाऊ माळी, पर्यवेक्षक राजेंद्र कोळी, सौ.विद्या सिसोदिया, भिकू त्रिवेदी व शिक्षकवृंदांनी कौतुक केले.

 

LEAVE A REPLY

*