भारत स्काऊट आणि जिल्हा गाईड संस्थांतर्फे चिंतन दिवस उत्साहात

0
नंदुरबार । नंदुरबार येथील यशवंत विद्यालयात बी.एड. कॉलेजमध्ये भारत स्काऊट आणि जिल्हा गाईड संस्थाच्या वतीने नुकताच चिंतन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यशवंत विद्यालयात बी.एड. कॉलेजमध्ये भारत स्काऊट आणि जिल्हा गाईड संस्थाच्या वतीने चिंतन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चित्रकला, निबंध गीत, गायन आदी स्पर्धा घेण्यात आल्यात, स्काऊटर शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत पाटील होते.

प्रमुख पाहूणे म्हणुन मुख्याध्यापक एम.एस.रघुवंशी, शिक्षण सभापती सोनिया पाडवी, सचिव वामन इंदिस, कोषाध्यक्ष नरेंद्र गुरव, सहसचिव एन.टी. पाटील, हेमंत पाटील, जिल्हा टेलर गाईड छाया पाटील, जिल्हा संघटक आयुक्त स्काऊट महेंद्र वसावे, गाईडर आयुक्त कविता वाघ आदी उपस्थित होते.

यापसंगी यशवंत पाटील म्हणाले की, स्काऊट शिक्षक हे सर्वांगिण विकासाचे शिक्षण आहे. चांगले काम करा त्याचे परमेश्वर कधी वाईट करत नाही. रोज एक सत्य कृत्य करा, स्काऊट उत्तम शिक्षण आहे. मोठयांचा नेहमी आदर करा असे ते म्हणाले, त्यानंतर बक्षिस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

खरी कमाई अंतर्गत जिल्ह्यात प्रथम शेठ व्ही.के. शाह विद्या मंदिर (शहादा), द्वितीय क्रमांक न्यु हायस्कुल (तळोदा), तृतीय नेमसुशिल विद्या मंदिर (तळोदा), उत्तेजनार्थ एस.ए.मिशन स्कुल (तळोदा), निबंध स्पर्धा प्रथम राजश्री कोळपकर (डॉ.काणे हायस्कुल, नंदुरबार), गाईड द्वितीय मुश्कान अंशु वर्मा (नेमसुशिल तळोदा), गाईड तृतीय मृणाली पाटील (एकलव्य नंदुरबार), गाईड प्रथम रोहित सोनवणे (डी.आर.हायस्कुल, नंदुरबार), द्वितीय रोहित सामुद्रे (अभिनव विद्यालय), तृतीय प्रज्वल सुर्यवंशी (मोती विद्यालय तळोदा) चित्रकला स्पर्धा स्काऊट प्रथम यश पवार (श्रॉफ हायस्कुल), द्वित्ीय जयेश जाधव (के.डी.गावीत विद्यालय गुजरभवाली), तृतीय चंद्रकांत जाधव (डी.आर. हायस्कुल), प्रथम वृषाली पवार (मोती विद्यामंदिर तळोदा), द्वितीय निकिता वाघ (एकलव्य विद्यालय), तृतीय दामिनी मोरे (शिवदर्शन विद्यालय भालेर)

गीत गायन स्पर्धा स्काऊट
प्रथम श्रॉफ हायस्कुल (नंदुरबार), द्वितीय एकलव्य विद्यालय (नंदुरबार), तृतीय दामिनी मोरे (एस.ए.मिशन), यशस्वी स्पर्धाकांना प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते शिल्ड प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या वेळी हेमंत पाटील, अशोक पाटील, हिरालाल पाटील, श्रीमती छाया पाटील, अशोक शिंदे, संकेत माळी, योसेफ गावीत यांनी प्रशिक्षण पूर्ण केले.

या शिक्षकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यशस्वीतेसाठी इच्छाराम बैसाणे, अशोक मराठे, पुूनम नेरकर, प्रसाद दिक्षीत, शारदा पाटील, सिंधु सावंत, नरेंद्र पाटील, स्वप्निल खैरनार, हितेश उपासनी, आशा पाडवी, स्वाती कुलकर्णी, निलेश गावीत, अशोक पाटील, गणेश चौधरी, त्रिवेदी, निलेश गावीत, अशोक पाटील, जे.व्ही. पवार, कमलेश पाटील आदींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

*