शहाद्याच्या सातपुडा कारखान्यात इथॅनॉल प्रकल्पाची चाचणी

0
शहादा |  ता.प्र. :  सातपुडा कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची चाचणी सुरु झाली असून आज सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजा करुन चाचणीतून निर्माण झालेले इथॅनॉलने भरलेला पहिला टँकर रवाना करण्यात आला.

सातपुडा कारखान्याच्या उपपदार्थ अवसानी (डिस्टीलरी) विभागाच्या नविन इथेनॉल प्रकल्पाची चाचणी सुरु असून त्यातील उत्पादित इथॅनॉल आज चेअरमन दीपक पाटील, कारखान्याचे संचालक उध्दव रामदास पाटील, एकनाथ रामु पाटील, आनंदराव भबुतराव पाटील, सुनिल संभू पाटील, अनिल भंसाली, रमाकांत संभू पाटील, उत्पादन शुल्क विभागाचे के.आर.चौधरी, कार्यकारी संचालक पी.आर.पाटील, जनरल मॅनजर अशोक पाटील, सेक्रेटरी सी.जी.पाटील, डिस्टीलरी मॅनेजर के.बी.पाटील, चिफ इंजिनिअर संजय चौधरी, शेतकी अधिकारी अजितकुमार सावंत, चिफ केमिस्ट विजय रोहिदास पाटील, चिफ अकौंटंट (डिस्टी.) पुनमचंद मिस्तरी, चिफ अकौंटंट(साखर) सुनिल चौधरी, संपर्क अधिकारी प्रविण पाटील, गणेश बबन चव्हाण, असि.मॅनेजर शरद पाटील, सिव्हील इंजि.विनोद भाईदास पाटील, शरद रामजी पाटील यांच्या उपस्थितीत टँकर रवाना करण्यात आले.

सातपुडा कारखान्याच्या डिस्टीलरी विभागाची १९७५ साली ३० पासून ते ७५ पर्यंत विस्तारीत झाली. तसेच १९९० यावर्षी १० चा प्रकल्प उभारणी करण्यात आली. अशाप्रकारे हा प्लांट विस्तारीत होत गेला. परंतु शासनाच्या विविध धोरणांमुळे उत्पादीत मालाच्या बाजारपेठेतील चढउतार पहाता सातपुडा कारखान्याच्या संचालक मंडळाने इथॅनॉल प्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्णय घेवून ३० चा इथॅनॉल प्रकल्पाचे उभारणीचे काम २०१७ यावर्षी हाती घेण्यात येवून जानेवारी २०१८ च्या सुरुवातीस हा प्रकल्प सुरु झाला पाहिजे असे प्रशासनाने ठरविले.

त्यानुसार त्याची चाचणी सुरु असून उत्पादित इथॅनॉल आज इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.या कंपनीत रवाना करण्यात आले. लवकरच या प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचा मनोदय असल्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*