जात पडताळणीबाबत बिगर आदिवासी संघटनांचा दबाव : आदिवासी महासंघातर्फे नंदुरबारच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

0
नंदुरबार |  प्रतिनिधी  :  बोगस आदिवासी जात प्रमाणपत्र व जात पडताळणीबाबत बिगर आदिवासी समाजिक संघटनेचा दबाव प्रशासनावर वाढत असलेबाबत योग्य ती कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकार्‍यांना आदिवासी महासंघातर्फे निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र बोगस आदिवासींबाबत वेठोवेळी शासन, प्रशासनात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. या शासन निर्णयाचा निकष पूर्ण करता काही बिगर आदिवासी जाती, बोगस आदिवासी म्हणून प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र कार्यालयात व जात पडताळणी कार्यालयासमोर मोर्चे व धरणे आंदोलने करीत असतात ही बाब निश्‍चितच खर्‍या आदिवासींवर अन्याय करणारी आहे.

प्रशासनावर राजकीय, सामाजिक दबाव टाकून आजपर्यंत लाखोंच्या संख्येने बोगस आदिवासी कर्मचार्‍यांची भरती करण्यात आलेली आहे,हे वेळोवेळी शासनाने संरक्षक दिलेल्या २००५ च्या शासन निर्णयान्वये सिध्द झालेले आहे. तरी देखील याप्रकरणी उपाय न करता शासन प्रणालतील शासन निष्पक्ष अंमबजावणी न होता राजकीय सामाजिक दबावाला बळी पडून बोगस आदिवासींना जातीचे दाखले व जात पडताळणी प्रमाणपत्रे दिली जात आहेत. असा आता आदिवासी सामाजिक संघटनेला बिगर आदिवासी संघटनेचे मोर्चे व धरणे आंदोलनामुळे संशय बळकावत आहे.

राज्याच्या अस्तित्वात असलेल्या अनुसूचित जमाती यादीतील आणि तत्सम जमाती व त्यांच्या नामसदृश्याचा फायदा घेवून स्वतःला आदिवासी म्हणवणार्‍या बिगर आदिवासी गटाच्या जाती जमातीची तुलनात्मक माहिती दर्शविणारे विवरपणपत्र तपासून अनुसूचित जमाती क्षेत्रानिहाय ५० वर्षाच्या रहिवाशी क्षेत्राचा निकष व वडिलोपार्जित आदिवासी जमीन धारक मजम १९६६ चे ३६ व ३६ (२) अन्वये मनाई हुकूमचा ७/१२ तपासून अनुसूचित जमाती, जातीचा दाखला व जात पडताळणी करीता शासन निर्णयातील विविध निकष पूर्ण करणारया आदिवासी जमातीचा जातीचा दाखला व जात पडताळणी होण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रशासनास दाखला देणेबाबत उसूचित क्षेत्रातील उपविभागीय जिल्हाधिकारी व तहसिलदारसह उपसंचालक अनुसूचित जमाती जात पडताळणी कार्यालय नंदुरबार यांना योग्य ते आदेश व्हावेत, याप्रकरणी झालेल्या कार्यवाहीचा उलट टपाली अहवाल कळविण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर अध्यक्ष डॉ.भरत वळवी, महासचिव बी.ई. वसावे, आदिवासी डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ.राजेश वळवी, वासुदेव गांगुर्डे, राजेंद्र पवार, प्रा.भिमसिंग वळवी, ऍड. जयकुमार पवार, अनिल वळवी, कैलास पाडवी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

LEAVE A REPLY

*