तरुणाला मारहाणीची चित्रफित व्हायरल

0
शहादा / शहरातील एका वसाहतीत मध्यरात्री पंधरा ते वीस तरुणांनी एकास बेदम मारहाण केल्याची चित्रफित सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे.
ते तरुण कोण होते, ज्या तरुणास मारहाण केली तो कोण होता? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
दि.12 मेच्या रात्री 2 वाजून 32 मिनीटांनी मंगलमुर्ती वसाहतीत पंधरा ते वीस तरुण मोटरसायकलीने आले. त्यांनी एका मोटरसायकलस्वाराला खाली पाडून अमानुष मारहाण केली.

या घटनेची सर्व चित्रफीत एका इमारतीवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. सर्व युवक गोल, टोपी, कुर्ता पायजमा परिधान केलेले होते.

डोंगरगांव रस्त्यावरील कॉलनीत घडलेली ही घटना शहरातील शांतता, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरणारी आहे. ही चित्रफित पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.

मात्र सीसीटिव्ही कॅमेरात कैद झालेले हल्लेखोर व बेदम मारहाण झालेल्या व्यक्तींचा शोध लागलेला नाही. सदर क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.

LEAVE A REPLY

*