महिलेला अश्लिल शिविगाळ करून मारहाण : तिघांना अटक

0
शहादा / पत्नीचे चारित्र्य खराब असे सांगून मोबाईलवर एकास अश्लिल शिवीगाळ करून लाकडी डेंगार्‍याने व लोखंडी पाईपने मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.
शहादा- दोंडाईचा रस्त्यावर प्रेस मारूती मैदानाच्या प्रवेशद्वारासमोर रात्री 8 वाजेच्या सुमारास फरजाना फैजल पतानी ही महिला पतीसह शतपावली करण्यास निघाली असता, तिला फोनवरून इम्रान मेमन याने अश्लिल शिवीगाळ केली.
तिला व तिच्या पतीला बेदम मारहाण करुन विनयभंग केला. मारहाण करतांना त्याने बेकायदेशीरपणे बाकीच्या लोकांना जमवून लोखंडी पाईप, लाकडी दंडयाने पती-पत्नीस मारहाण केली.

याप्रकरणी इम्रान मेमन, बाबू उर्फ सरफराज मेमन, सरदार मेमन या तिघांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

पोलीस निरीक्षक बुधवंत तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी येवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

मारहाण करणार्‍यांमध्ये नंदुरबार येथील सोनी उर्फ वंदना बारी, अमोल ठोंबरे हे यांचा समावेश होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*