महावितरणच्या मनमानीविरोधात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

0
नंदुरबार / नंदुरबार येथील साक्रीनाका परिसरात युवा सेनेचे उप जिल्हाप्रमुख पंकज चौधरी यांच्या घरी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी पूर्व सूचना न देता घरात घुसून धक्का बुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांना पंकज चौधरी व परिसरातील युवकांनी आज निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, पंकज चौधरी यांच्या पुरूष मंडळी नसतांना वीज वितरण कंपनीचे अभियंता प्रदीप सावंत व कर्मचारी व्यास यांच्यासह चार पाच कर्मचार्‍यांनी घरात घुसून धक्का पंकज चौधरी यांच्या आई धक्काबुकी व शिवीगाळ केली.

साक्रीनाका परिसरात हे अधिकारी याच पध्दतीचा व्यवहार करीत असून दहशत निर्माण करीत आहे. यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*