जलयुक्त शिवार ही योजना टंचाईग्रस्त गावांना वरदान

0
नंदुरबार / जलयुक्त शिवार ही योजना टंचाईग्रस्त गावांना वरदान ठरणारी असून या योजनेत लोकसहभाग महत्वाचा आहे.त्याशिवाय ही योजना यशस्वी होवू शकत नाही. या जिल्ह्याला जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या परिश्रमामुळे जलयुक्त शिवार योजनेचे काम यशस्वीरित्या होत आहे.
सरकारी कर्मचारी व ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी समन्वयातूून ही चळवळ यशस्वी करावी असे आवाहन आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी रनाळे येथील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाला शुभारंभ करतांना केले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाचे रनाळे व रनाळे परिसर हा अवर्षण प्रवणग्रस्त भाअ ूसन या परिसरातील जलयुक्त शिवाराच्या कामासाठी निधीची कमतरता भासु देणार नाही.

फक्त लोकप्रतिनिधी व अधिकारी सहकार्‍यांनी कामाची गुणवत्ता राखून उत्तम काम करावे. विशेष बाब म्हणजे रनाळे हे गाव मुख्यमंत्री महोदया यांनी दत्तक घेतले असून येथे मुख्यमंत्री यांचा निधी व नियमीत जलयुक्त शिवार योजनेतील निधी उपलब्ध करून या गावात जास्तीचे काम करणार आहोत.

परंतु लोकसहभाग हा या चळवळीचा आत्मा असून आपण लोकसहभागातून जास्तीत जास्त काम करावे की, जेणेकरून आम्हास निधी देतांना अडचण येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*