…अन् रघुवंशी दाम्पत्याचा अश्रुंचा बांध फुटला

0

नंदुरबार । नंदुरबार नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत विजय मिळविल्यावर आ.चंद्रकांत रघुवंशी आणि सौ.रत्ना रघुवंशी यांच्या अश्रुंचा बांध फुटला अनू दोघांनी एकमेकांना आलिंगन देत अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. त्यामुळे काही वेळ वातावरण गंभीर झाले होते.

येथील नगरपालिका निवडणुक ही प्रथमच एवढया चुरशीची व प्रतिष्ठेची झाली. ही निवडणूक आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर भाजपाचे डॉ.रविंद्र चौधरी यांच्यासाठी अस्तित्वाची होती. त्यामुळे दोघांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली होती.

निवडणुकीत दोघा आमदारांचे कुटूंबिय निवडणुक रिंगणात होते. भाजपातर्फे परिवर्तन व रोजगार तर काँग्रेसतर्फे विकासावर मते मागण्यात आली. त्यात नगराध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार सौ.रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपाचे डॉ.रविंद्र हिरालाल चौधरी यांच्या 4 हजार 784 मतांनी पराभव केला. निकालानंतर आमदार कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

कार्यालयाजवळ ढोल ताश्यांसह डिजेवर कार्यकर्ते जल्लोष साजरा करीत होते. तेव्हा विजयी उमेदवार सौ.रत्ना रघुवंशी या आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याजवळ पोहचल्या.

आतापर्यंत चंद्रकांत रघुवंशी व सौ. रत्ना रघुवंशी यांनी धैर्याने निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचे काम केले होते. मात्र हे दाम्पत्य समोरासमोर आले असता दोघांचा धैर्याचा बांध फुटला.

अन् दोघांनी आनंदाश्रुंना वाट मोकळी करून दिली. आ.चंद्रकांत रघुवंशी, व सौ.रत्ना रघुवंशींचा अशा भावनात्मक प्रतिक्रयेला बघून सभोतालचे वातावरण धीरगंभीर बनले होते.

आतापर्यंत उत्कृष्ट वक्ता, आरोपाचे खंडन करणारा अशा कितीतरी रूपात दिसणारे चंदुभैय्यांचे हे भावनीक रूप पाहून सर्वांच्याच डोळयात अश्रु आले. मात्र त्यानंतर आ.रघुवंशींनी पक्षाच्या विजयी घोषणा देत वातावरण पुर्वपदावर आणले.

LEAVE A REPLY

*