# Live Update # नंदुरबार नगरपालिकेत कॉंग्रेसचा झेंडा : २४ जागांवर विजय

0
नंदुरबार : प्रतिनिधी : नंदुरबार नगरपालिकेच्या ३९ जागांपैकी तब्बल २४ जागां जिंकुन कॉंग्रेसने नगरपालिका ताब्यात ठेवली आहे. तर भाजपाला केवळ ११ जागांवरच विजय मिळवता आला.

१३ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी करण्यात आली. २० टेंबलांवर ९६ कर्मचार्‍यांनी मतमोजणी केली. नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या ३९ जागांसाठी शहरातील १ लाख २६३ मतदारांपैकी ४९ हजार ८८० पुरूष व ५० हजार ३८१ स्त्री मतदारांनी मतदान केले होते. एकूण ७०.९३ टक्के मतदान झाले होते. सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीस सुरवात झाली.

कॉंग्रेसचा विजय

यात कॉंग्रेसने ३९ जागापैकी २४ जागां जिंकुत आपले वर्चस्व राखले आहे. तर भाजपाला ११ जागांवर विजय मिळवत समाधान मानावे लागले आहे. तर शिवसेनेला केवळ ४ जागा मिळाल्या आहेत.

लोकनियुक्त नगराध्यक्षासाठी रत्ना सुर्यंवशी यांना ३६१६१ मते मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी भाजपाचेडॉ. रविंद्र चौधरी यांना ३१३८० मते मिळून पराभव झाला आहे.

LEAVE A REPLY

*