दुकाने फोडली

0
शहादा / शहरातील खेतिया रस्त्यालगत सुपर ग्लाससह तीन दुकानांचे कुलूप टॅमीने तोडून दुकानातून 27 हजार रुपयांची रोकड चोरटयांनी लंपास केली.
या प्रकारामुळे ‘टॅमी’चोरी गँग सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. पोलीसांनी रात्रीची गस्त वाढवून या चोर्‍यांवर आळा बसविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.

शहरातील अंबाजीनगरला लागून बॉम्बे मार्केट शॉपिंग सेंटरमध्ये दहा-बारा दुकाने आहेत. हे कॉम्प्लेक्स रहदारीच्या मुख्य रस्त्यालगत आहे. बॉम्बे मार्केटमध्ये अब्बास मझहर हुसेन नुरानी यांचे सुपर ग्लास हाऊस नावाचे शॉपिंग आहे.

ते काचेचे ग्लास, खिडकी, फ्रेमचे काम करीत असतात. गुरुवारी दिवसभराच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून रोख 27 हजार रुपये लोखंडी गल्ल्यात ठेवले होते.

दुकानावर आले तेव्हा अज्ञात चोरट्यांनी दोघे दुकानाचे चार कुलूप टॅमीने तोडल्याचे दिसून आले. चोरटयांनी एवढ्यावरच न थांबता दुकानाचे शटर लावून पंखा सुरू करून दुकानाची तपासणी केली.

त्यात लोखंडी गल्ल्यातील 27 हजाराची रोकड लंपास केली. याच चोरट्यांच्या काही साथीदारांनी मार्केटच्या पुढे असलेल्या संजयकुमार बाबुलाल यांचे एस.बी. प्रोव्हीजन दुकानाचे कुलूप टॅमीने तोडत असतांना लगतच राहणार्‍या रहिवाशांना जाग आली.

अज्ञात चोरट्यांनी टॅमी तेथेच टाकून पळ काढला. पोलीसांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती जाणून घेतली. चोरट्यांनी सोडून दिलेली टॅमी पोलीसांनी जप्त केली आहे.

शहरातील दुकानाचे कुलूपे टॅमीने तोडल्याने दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. टॅमी गँगचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस प्रशासनापुढे आव्हान उभे राहिले आहे.

चोरट्यांनी घेतला काजू-खजूरचा स्वाद
सुपर ग्लासचे मालक अब्बास नुराणी नुकतेच हज यात्रा करून आले. प्रसाद म्हणून काजू व खजूर मित्रांना वाटण्यासाठी दुकानात ठेवला होता. रात्रीतून चोर दुकानात येवून त्यांनी फस्त केला.

LEAVE A REPLY

*