भाव मिळत नसल्याने मध्यप्रदेशात कांदे विक्री

0
शहादा / कांद्याला कमी भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी मध्यप्रदेशात जावून कांद्याची विक्री करतांना दिसत आहे.
तालुक्यातील शेतकर्‍यांना यंदा कांद्याचे एकरी 150 ते 200 क्विंटल उत्पादन आहे. अनेक शेतकर्‍यांनी एका एकरात 350 वाफे तयार करून कांद्याची लागवड केल्याने उत्पादनात वाढ झाली आहे.
यंदा मोठ्या आणि चांगल्या दर्जाच्या या कांद्याला व्यापारी क्विंटल मागे हजार ते 1 हजार 200 रुपये भाव देतील अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती.
मात्र तसे झाले नाही. सद्यःस्थितीत कांद्याची 500 ते 700 रुपये क्विंटलने विक्री होत आहे. जास्त तापमानामुळे उन्हाळ्यात कांदा खराब होण्याची शक्यता अधिक असते.

त्यामुळे अनेक शेतकरी साठा करून ठेवण्यापेक्षा कांदा विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत. स्थानिक बाजारपेठेत कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने काही शेतकरी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये जाऊन कांद्याची विक्री करत आहेत.

दरम्यान, कांद्याला भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी घरोघर जावून आपला कांदा विकण्याचा प्रयत्न करत आहे.

LEAVE A REPLY

*