मुख्यमंत्री ग्रामपंचायत निवडणूकीचाही प्रचार करतील : ना.दादा भुसे यांची टीका

0

नंदुरबार । राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे आगामी काळात ग्रामपंचायत निवडणुकीचाही प्रचार करतील का अशी चिंता वाटते. भगूर येथे मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. परंतु भगूरमध्ये कमळ फुलले नाही. गुजरातमध्ये भाजपाचे हाल झालेले पाहून येत्या काळात शिवसेना व काँग्रेसला अच्छे दिन येतील, असा विश्वास राज्याचे सहकार राज्यमंत्री ना.दादा भुसे यांनी केले.

येथील पालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर झालेल्या प्रचार सभेत ना.भुसे बोलत होते. यावेळी आ.चंद्रकांत रघुवंशी, शिवसेनेचे नेते लक्ष्मण वडेले, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्क प्रमुख संजय उकीरडे, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे आदी उपस्थित होते. ना. भुसे म्हणाले की, नाशिक शहराला दत्तक घेण्याची घोषणा करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी सात महिन्यात नाशिकसाठी काय केले, याचा आधी हिशोब द्यावा.

त्यानंतर नंदुरबारला दत्तक घेण्याची भाषा करावी. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. म्हणून काहीही घोषणा करतात. घोषणा करायला पैसे लागत नाहीत.

गुजरातमध्ये भाजपची स्थिती खराब असून त्यामुळे येत्या काळात काँग्रेस व शिवसेनेला अच्छे दिन आल्याशिवाय राहणार नाहीत. नंदुरबार शहर भयमुक्त झाले पाहिजे. शिवसेनेने कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही.

शिवसेनेचे बबनराव थोरात म्हणाले की, शिवसेनेवर टीका करण्याचा कुणालाही अधिकार नाही. भाजप ही गाजर पार्टी झाली आहे. काँग्रेस नेत्यांचे विचार चांगले आहेत.

म्हणून शिवसेनेने काँग्रेसशी युती केल्याचे ते म्हणाले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कारभारावर भाषणामधून टिकाटिप्पणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

*