डीजे बंद करण्याच्या वादातून हवालदाराला मारहाण

0
नंदुरबार / शहरातील माळीवाडा परिसरातील भद्राचौक येथे डीजे बंद करण्यास सांगितल्याचा राग आल्याने एकासह तिघांनी हवालदाराला मारहाण केल्याची घटना घडली.

पो.हे.कॉ.श्रावण बिर्‍हाडे नेम.सारंगखेडा पोलीस स्टेशन, तैनात पोलीस मुख्यालय नंदुरबार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माळीवाडा परिसरातील भद्राचौक येथे उशिरापर्यंत चालू असलेला डीजे बंद करण्यास सांगितल्याचा राग आल्याने धर्मेंद पाटील व त्यांच्यासह अन्य दोन जण यांनी हे.कॉ.बिर्‍हाडे यांच्याशी हुज्जत घालून धक्काबुक्की केली.

तसेच वाईट शिवीगाळ करून मारहाण केली.

 

LEAVE A REPLY

*