मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज अश्व संग्रहालयाचे भूमिपूजन

0

शहादा/सारंगखेडा । दि.7 । तालुक्यातील सारंगखेडा येथील चेतक फेस्टीव्हल अंतर्गत जागातील तिसरे व आशिया खंडातील पहिल्या अश्व संग्रहालयाच्या भुमिपूजनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या दि.8 रोजी येणार आहे, अशी माहिती चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी दिली.

तालुक्यातील सारंगखेडा येथील श्री एकमुखी प्रभुंच्या यात्रौत्सवाला 3 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. घोडेबाजार व चेतक फेस्टिवलमुळे ही यात्रा संपुर्ण देशात प्रसिद्ध आहे.

या यात्रेला साडेतीनशे वर्षांपेक्षा जास्तीचा इतिहास आहे. यावर्षी पर्यटन विभाग व चेतक फेस्टिवलचे आंतरराष्ट्रीय स्तरावर यात्रा पोहोचविण्याचे स्वप्नदेखील पूर्ण झाले असल्याचेही रावल यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी यंदा सारंगखेडा फेस्टिवलसाठी पर्यटन विभागाकडून 5 कोटींचा निधी मंजूर केला होता. तसेच पर्यटन विभागाकडून सारंगखेडा येथे जगात तिसरे व भारतात प्रथम क्रमांकाचे अश्व संग्रहालयाचा भूमिपुजनाचा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाला खा.डॉ.हिना गावीत, आ.विजयकुमार गावीत, आ.चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आमदार, लोकप्रतिनिधी व पर्यटन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

घोडे बाजारात सव्वा कोटीची उलाढाल
येथील घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या यात्रेत आतापर्यंत दोन हजारावर घोडे दाखल झाले आहेत. त्यापैकी 452 घोडयांची विक्री झाली असून त्यातून 1 कोटी 19 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.

LEAVE A REPLY

*