तळोदा तालुकाध्यक्षपदी विशाल कर्णकार तर अक्कलकुवा तालुकाध्यक्षपदी मनोज मगरे

0

तळोदा । व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघाच्या तळोदा तालुकाध्यक्षपदी विशाल कर्णकार तर अक्कलकुवा तालुकाध्यक्षपदी मनोज मगरे यांची निवड करण्यात आली आहे. ही बैठक बोरद येथील मॉडर्न इंग्लिश मेडीयम स्कुल येथे घेण्यात आली.

या बैठकीला व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद साळुंके, विभागीय सचिव सुनिल महाले, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गुरव, उपाध्यक्ष कलीम पिंजारी, सचिव संकेत माळी, उपाध्यक्ष सुरेश जव्हेरी, विभागीय सदस्य धर्मेंद्र तांबोळी, प्रल्हाद ठाकुर, रमेश चव्हाण, संघटक विशाल साळुंखे, दिनेश राठोड, अनिल गुवर, अनिल नवले आदींसह कलाशिक्षक उपस्थित होते.

यावेळी प्रल्हाद साळुंके म्हणाले की, कलाशिक्षकांचे संघटन काळाची गरज आहे. कलाशिक्षकांवर अन्याय होवू नये यासाठी ही संघटना आहे, असे सांगितले.

कलाशिक्षक हा शाळेचा आत्मा असतो. त्यामुळे शाळेची वेगळी ओळख असते. कलाशिक्षकांनी आपले अस्तीत्व टिकविण्यासाठी आपल्या विषयांवर प्रेम केले पाहिजे. कलेविषयी सखोल ज्ञान ग्रहण करून विद्यार्थ्यांना कलेविषयी योग्य ते मार्गदर्शन केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील कार्यकारिणी नंदुरबार जिल्हाध्यक्ष नरेंद्र गुरव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली. ती पुढील प्रमाणे तळोदा तालुका कार्यकारिणी अध्यक्ष विशाल कर्णकार, उपाध्यक्ष अनिल गुरव, सचिव सखाराम पावरा, कार्यवाहक आकाश टवाळे, संपर्क प्रमुख सुरेश जोहरी, कोषाध्यक्ष पंकज मोरे, महिला प्रतिनिधी श्रीमती प्रतिभा टवाळे, अनिता पटेल, ज्योती गुरव, सदस्य सतीष ठोणे यांची निवड करण्यात आली.

अक्कलकुवा तालुका कार्यकारिणी अध्यक्ष मनोज मगरे, उपाध्यक्ष लालचंद वाडिले, उपाध्यक्ष अनिल नवले, तालुका सचिव दिनेश राठोड, सहसचिव के.आर. वळवी, कार्यवाहक विष्णू माळी, शेख अबरार, कार्याध्यक्ष व्ही.एस. पाटील, अमोल पाटोळे, रमेश चव्हाण संपर्क प्रमुख अमोल टवाळे यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सदस्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*