महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कारासाठी पत्रकारांना प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

0
नंदुरबार / महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत पत्रकारांसाठी शासनाने जिल्हा, विभाग, राज्यस्तरावर पुरस्कार देण्याची योजना जाहीर केली आहे.
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील पत्रकारांनी या पुरस्कारासाठी आपल्या प्रवेशिका 31 मे पर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पत्रकार पुरस्कार जिल्हास्तरीय समितीने केले आहे.
जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार 25 हजार रुपये, द्वितीय पुरस्कार 15 हजार रुपये, तर तृतीय पुरस्कार 10 हजार रुपये असा आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रसिध्दीसाठी पत्रकारांनी दि.2 मे 2016 ते 1 मे 2017 या कालावधीमध्ये मोहिमेचे प्रसिध्द केलेले साहित्य पुरस्कार पात्रतेकरीता ग्राह्य धरण्यात येईल.

पुरस्कारासाठी दिलेल्या कालावधीत वृत्तपत्रे, नियतकालिकांमधून प्रसिध्द झालेले टीकात्मक लेख, वृत्तांकन, बातम्या, अग्रलेख, फोटो फिचर्स अशा साहित्याचा विचार करण्यात येईल.

 

LEAVE A REPLY

*