नंदुरबारात उद्या मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा

0

नंदुरबार । नंदुरबार नगरपालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची दि. 8 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती खा.डॉ.हीना गावीत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नंदुरबार, नवापूर व तळोदा पालिकांच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु आहे. निवडणूकीसाठी दि. 11 डिसेंबरपर्यंत जाहीर प्रचार करता येणार आहे. त्यामुळे दररोज प्रचारसभा, कॉर्नरसभांवर भर दिला जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे चेतक महोत्सवानिमित्त दि. 8 डिसेंबर रोजी सारंगखेडा येथे येणार आहे. त्यांच्या हस्ते आशिया खंडातील सर्वात मोठे अश्वसंग्रहालयाचे भुमिपूजन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासोबतच ते नंदुरबार जिल्हयातील नगरपालिकांच्या निवडणूकीच्या प्रचारासाठीही येणार आहे. ना.फडणवीस यांची दि. 8 रोजी दुपारी 2 वाजता शहरातील दीनदयाल चौकात जाहीर सभा होणार आहे.

या सभेला नंदुरबारसह नवापूर व तळोदा येथील भाजपाचे सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार, सर्व नगरसेवकपदाचे उमेदवार, पदाधिकारी व कायकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खा.डॉ.हीना गावीत यांनी दिली. यावेळी भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ.रविंद्र चौधरी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*