मुख्यमंत्र्यांना काळे झेेंडे दाखवणार ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

0

शहादा । सिंचन योजना सुरू करण्यासाठी निधी दिला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

सारंगखेडा येथील चेतक फेस्टीवलला कोटयावधींचा निधी देणार्‍या मुख्यमंत्र्यांना शेतकर्‍यांसाठी महत्वाच्या असलेल्या सिंचन योजनांकडे लक्ष देण्यास वेळ नाही,तापीचे पाणी शेतापर्यंत पोहोचवण्यात मुख्यमंत्र्यांना अपयश आल्याने त्यांना सारंगखेडा येथील कार्यक्रमाप्रसंगी काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

जिल्ह्यातील 22 बंद पडलेल्या उपसा सिंचन योजना अद्यापही सुरू झालेल्या नाही.या योजनांच्या दुरूस्तीसाठी राज्य शासनाने 40 कोटींचा निधी मंजूर केला आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांनी अनेकदा या योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले. गेल्या महिन्यात सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 15 दिवसात उपसा सिंचन योजनांच्या दुरूस्तीला सुरूवात केली जाईल, असे आश्वासन दिले होते.

आता निविदेचे कारण सांगून प्रश्न रेंगाळत ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांना अद्यापही कर्जमाफी मिळालेली नाही.

कापसाला भाव नाही तसेच बोंडअळीमुळे कापसाचे नुकसान हेात असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तापीचे पाणी सरळ गुजरातमध्ये वाहून जाते.

उकाई धरणाचे बॅकवॉटर पाहण्यासाठी मंत्री दरवर्षी या भागात सहल काढतात. प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमध्ये पाणी साचले असून, प्रकाशा बॅरेजला गळती लागल्यामुूळे पाणी वाहून जात आहे.

शेतकर्‍यांच्या आर्थिक उत्थानासाठी बॅरेजेस बांधण्यात आले. परंतु बंद पडलेल्या उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी कुठल्याही मंत्र्यांना वेळ नाही.

मुख्यमंत्री दि. 8 डिसेंबर रोजी सारंगखेडा येथे अश्वसंग्रहालयाच्या भुमिपूजनासाठी येणार आहेत. त्याप्रसंगी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*